आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Starts Speech In Hindi Mera Pyar Bhara Namaskar

भारत-अमेरिकेदरम्यान अणू करारामध्ये दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि अमेरिकादरम्यान अणूनागरी सहकार्य करारावर एकमत झाले असल्याचे दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर स्पष्ट झाले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका न्युक्लिअर मटेरियल ट्रॅक करण्याच्या आपल्या अटीवरून एक पाऊल मागे सरकत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दोघांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या विनंतीला मान देऊन अत्यंत व्यस्त असतानाही वेळात वेळ काढून भारतात येण्यासाठी बराक ओबामा आणि मिशेल यांचे मी मनःपूर्वक धन्यवाद मानतो. बराक ओबामांचा हा दुसरा भारत दौरा असल्याने हा दौरा येणार्‍या दिवसात बारत आणि अमेरिकेच्या नातेसंबंधांसाठी खुपच महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे ओबामांनी आपल्या भाषणाची सुरूवात 'नमस्ते' अशी करत, "मेरा प्यार भरा नमस्कार" असे हिंदीत बोलत उपस्थितांची मने जिंकली. पुढे ओबामा म्हणाले की, "मला प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून येण्याचे आमंत्रण मिळाल्यामुळे हा बहूमान मिळालेला मी पहिला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनलो आहे. मी दुसर्‍यांदा भारतात येणारा पहिला राष्ट्राध्यक्ष आहे. आम्ही भारत आणि अमेरिकेच्या नातेसंबंधांना एका विशेष उंचीवर घेऊन जाऊ इच्छितो. आम्ही अणू करारात एक पाऊल पुढे आलो आहे."
ओबामांनी हैदराबाद हाऊसमध्ये मोदींसमवेत चहापान करताना चर्चा केली. तसेच मोदींच्या जनधन योजना आणि स्वच्छ जल उपलब्ध करून देण्याच्या योजनेचेही कौतूक केले. ओबामा यांनी इराणला अणू शस्त्रांचा विकास करण्यापासून थांबवण्याच्या दिशेने भारताच्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या दोन्ही दिग्गजांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी, भारत आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळांसमवेत अणू नागरी सहकार्य करारांच्या मुद्द्यांवर चर्चा केली.


अणू नागरी सहकार्य करारातील महत्त्वपूर्ण बाबी
- इन्शोरन्स पूल बनवले जाण्याची शक्यता, यामध्ये चार मोठ्या विमा कंपन्यांचा सहभाग असेल
- अणू सामग्रीमध्ये ट्रॅकींगच्या अटीवरून अमेरिकेने घेतली माघार

पुढील स्लाईडवर पाहा, मोदी ओबामा यांच्या भाषणादरम्यानची काही क्षणचित्रे...