आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Will Stay In Hotel Mourya During Visit To India

हॉटेल मोर्यच्या ग्रँड प्रेसिडेंशियल सूटमध्ये ओबामा घेणार पाहुणचार, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या दौर्‍यादरम्यान दोन्ही देशांचे प्रमुख अधिकारी ओबामांच्या सुरक्षेपासून ते त्यांच्या खाण्या पिण्याच्या व्यवस्थांवर नजर ठेवून आहेत. ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा दिल्लीच्या आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. येथे ग्रँड प्रेसिडेंशियल सूटमध्ये ते पाहुणचार घेतील.

अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हीसने या हॉटेलचे सर्व तिन्ही मजले आतापासूनच ताब्यात घेतले आहेत. अमेरिकेच्या सुरक्षा पथकाने हॉटेलमध्ये एक मल्टी फ्रिक्वेंसी कंट्रोल रूमही थाटले आहे. या हॉटेलच्या चारही बाजुंना सुरक्षा संस्थांनी घेरले आहे. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. हॉटेलच्या आत आणि बाहेर अमेरिकेच्या जवानांसह भारतीय जवानही तैनात असतील.
खिडक्याही बुलेटप्रूफ
ओबामा आयटीसीच्या ग्रँड प्रेसिडेंशियल सूटमध्ये थांबणार आहेत. हॉटेलच्या 14 व्या मजल्यावर हा सूट आहे. याच्या सर्व खिडक्या खास बुलेटप्रूफ काचेच्या तयार करून घेण्यात आल्या आहेत. ओबामांबरोबर आलेले पथकही याच हॉटेलमध्ये थांबणार आहे. ओबामांच्या सेक्युरिटीचा विचार करता या हॉटेलला एखाद्या किल्ल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
सूटमध्ये खास काय?
या सूटमध्ये येण्या आणि जाण्याचा रस्ता इतर खोल्यांपेक्षा वेगळा आहे. हॉटेलमध्ये गाड्या पार्क करण्याची जागा वेगळी देण्यात आली असली तरी खोलीत येण्यासाठी आणि जाण्यासाठी एका हायस्पीड एलिव्हेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सूटमध्ये दोन बेडरूम आहेत. त्यांच्यात असलेल्या रस्त्यामध्ये लाकडी काम करण्यात आलेले आहे. तसेच एक लिव्हींग रूम, स्टडी रूम, पिकॉक थीमवर तयार केलेले एक डायनिंग रूम आणि लग्जरी बाथरूम आहे.
त्याशिवाय याठिकाणी मिनी स्पा आणि जिमही आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही हे सूट हायटेक आहे. प्रत्येक खोलीत 55 इंचांचे हाय डेफिनेशन टिव्ही आहेत. तसेच आयपॅढ आणि आयपॉड डोकिंग स्टेशनही आहेत. एक लॉजही आहे. त्याठिकाणी बैठक घेता येऊ शकते.
केव्हा काय करणार ओबामा
25 जानेवारी ला ओबामा कुटुंबासह दिल्लीला येणार आहेत. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते सहभागी होतील. त्यानंतर 27 जानेवारीला आगरा येथ जाऊन ताजमहाल पाहतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा, हॉटेलच्या आतील फोटो...