आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Obama Visit : मलाही मोदी कुर्ता घालायचा होता, ओबामांनी व्यक्त केली इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवसभरातील बैठकांच्या सत्रानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी खास मेजवानीचे आयोजन केले होते. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या या भोजपन सोहळ्याला खास निमंत्रितांची उपस्थिती होती. यात लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह आणि सुषमा स्वराज यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांचा आणि मंत्र्यांचा समावेश होता. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही यावेळी उपस्थिती होती. देशातील काही प्रमुख उद्योगपतींनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर सरन्यायाधीश आणि लष्कराचे तिन्ही सेनाप्रमुख यांचीही यावेळी उपस्थित होती. दरम्यान, आज मलाही मोदी कुर्ता परिधान करण्याची इच्छा झाली होती असे यावेळी बोलताना बराक ओबामा म्हणाले.
पुढील स्लाइडवर पाहू, या सोहळ्याचे PHOTO