आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama's India Tour : Tight Security Around Obama

सुरक्षा चक्रात ओबामा! गुप्तचर, स्निफर डॉग्ज, उपग्रहांचीही मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखाद्या परदेशी पाहुण्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरवण्यात येत आहे. बराक ओबामा हे सातस्तरीय सुरक्षा वेढ्यात असतील. यासाठी सुरक्षा रक्षक, गुप्तहेर आणि स्निफर डॉग्जसोबतच उपग्रहांचीही मदत घेतली जात आहे. दरम्यान, ओबामा यांच्यावर बॉम्बहल्ला होणार असल्याची अफवा पसरवणारे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. आयएस या दहशतवादी संघटनेकडून याचा वापर सुरू होता. मॅग्नेट गॅस नामक हे अकाउंट मध्य आशियातून ऑपरेट केले जात होते. ओबामा यांच्या आशिया दौ-यात त्यांच्यावर रासायनिक कार हल्ला योग्य ठरेल, असे ट्विट यावर १९ जानेवारीला करण्यात आले होते. या अकाउंटचा आयपी अॅड्रेस अत्यंत गुप्त आणि कोणाला मिळणे कठीण होते.

आज सकाळी १० वाजता येणार ओबामा, राजधानीला रंगरंगोटी
*देशातील सर्व गुप्तचर संस्था आणि सुरक्षा यंत्रणा - रॉ, आयबी, एनएसजी, एसपीजी आणि दिल्ली पोलिस तैनात.
*३ किलोमीटर लांबीच्या राजपथावर ५०० सीसीटीव्ही कॅमेरे. लायसन्स प्लेट आणि चेहरे ओळखणारे कॅमेरेही लावण्यात आले आहेत.
*अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेच्या अधिका-यांसाठी हॉटेल मौर्यमधील ६०० खोल्या बुक करण्यात आले आहेत. यासाठी हॉटेलला सात कोटींपेक्षाही जास्त रक्कम देण्यात आली आहे.
*राजपथावरील ४५ उंच इमारतींना टाळे ठोकण्यात आले आहेत.
*७१ इमारतींवर तरबेज नेमबाज तैनात करण्यात आले आहेत.
*दिल्लीच्या परिसरातील ४०० किलोमीटरचा क्षेत्र नो फ्लाय झोन असेल. यात जयपूर, दिल्ली, आग्रा व पाकच्या सीमाभागाचा समावेश आहे.
*बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांच्या जेवणाची तपासणी ३ स्तरांवर.

७ स्तरीय सुरक्षा
१) ओबामा बुलेटप्रूफ ग्लास केबिनमध्ये बसतील. सभोवती ३५० अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस एजंट्स, सीआयए व एफबीआयचे कडे. सुपर कमांडर डॉग्ज जॉर्डन व हरिकेन असतील.
२) ५०० नेव्ही सील्ससोबत १६०० कमांडो
३) एनएसजी व एसपीजीचे १००० कमांडो तैनात
४) राजपथाच्या दोन किमी क्षेत्रात अमेरिका व एनएसजीचे १००० स्नॅपर्स असतील. १० हजार निमलष्करी दलाचे जवान तैनात.
५) ३० हजार पोलिस राजपथाशी संलग्न मार्गावर.
६) मध्य, उत्तर व दक्षिण दिल्लीमध्ये ८० हजार जवान तैनात असतील.
७) निर्धारित ठिकाणी २० हजार पोलिस तैनात
पुढे वाचा...