आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama's Life Shorten By 6 Hours In Three Day's Of Delhi

दिल्लीत 3 दिवस राहिल्याने ओबामांचे आयुष्य 6 तासांनी घटले, अमेरिकेतील माध्यमांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सीईओ फोरमच्या कार्यक्रमात सहभागी झालेले ओबामा.
नवी दिल्ली - अमेरिकेच्या माधअयमांनी दावा केला आहे की, दिल्लीत तीन दिवस राहिल्यामुळे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आयुष्यमान सहा तासांनी घटले आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाचा उल्लेख असलेला अमेरिकेच्या माध्यमांचा एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यात म्हटले आहे की, दिल्लीत प्रदूषणाची पातळी अत्यंत जास्त असून ओबामांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार जगातील सर्वाधित पीएम 2.5-थिनी दिल्लीच्या हवेत आहे. हवेत असलेल्या या विषारी कणांमुळे श्वासासंबंधीचे आजार, लंग्ज कँसर आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, ओबामांच्या तीन दिवसांच्या दौर्‍या दरम्यान दिल्लीचे पीएम 2.5 पातळीवर सरासरी 76-84 मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर एवढे होते. हा आकडा भारताच्या मंत्रालयाने नोंदवलेला आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ कँब्रिजचे सांख्यिकीतज्ज्ञ डेव्हीड स्पीगलहॅल्टर यांच्या मते, या प्रदूषणाचा विचार करता एका दिवसात ओबामांचे आयुष्यमान दोन तासांनी घटले आहे. डेविड स्पीगलहॅल्टर हे प्रदूषणाने निर्माण होणआर्‍या धोक्याच्या बाबतीच विशेषज्ञ आहेत.

स्पीगलहॅल्टर यांच्या मते एका दिवसांत आठ सिगारेटमुळे जेवढी हानी होऊ शकते तेवढी या प्रदुषणामुळे ओबामांना झाली आहे. या प्रदुषणामध्येच ओबामा दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यासाठी दोन तास खुल्या वातावरणात बसलेले होते.

ओबामांच्या दौर्‍यावर येण्यापूर्वीच अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी दिल्लीच्या वायू प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. दिल्लीतील अमेरिकेच्या दुतावासाने दौर्‍यासाठी 1800 स्वीडिश एयर प्युरीफायर्स खरेदी केले होते, अशी माहितीही मिळाली आहे. योगायोग म्हणजे, कार्बन डाईऑक्साइडच्या उत्सर्जनाचा विचार करता अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक आहे, तर भारत याबाबतीच तिसर्‍या स्थानावर आहे.