आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SC ने याचिकाकर्त्याला फटकारले; बंद नाही होणार ऑड-इव्हन, सर्वांच्या सहकार्याची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑड-इव्हन फॉर्म्यूलावर (सम-विषम) प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकाकर्त्याला गुरुवारी सुप्रीम कोर्टाने फटकारले. या प्रकरणी सुनावणी करण्यात कोर्टाने होकार दिला असला तरी लवकरात लवकर सुनावणी करण्यास नकार दिला. कोर्टाने अशी याचिका म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले.

सर न्यायाधीश टी.एस.ठाकूर म्हणाले, 'लोक प्रदुषणामुळे मरत आहेत आणि तुम्ही या योजनेला आव्हान देत आहात.'

- 'याचिकाकर्त्यांचे अपील हा स्वस्त प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे वाटते. त्यांना फक्त पेपरमध्ये आपले नाव छापण्यात इंटरेस्ट दिसतो.'
- 'दिल्लीची हवा स्वच्छ करण्यासाठी केवळ सरकारलाच नाही तर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.'
- 'जर कुठे चूक असेल तर कोर्ट नक्कीच सरकारला ऑर्डर करेल, मात्र याचिकेवर त्वरीत सुनावणीची गरज नाही.'
- 'दिल्लीत या फॉर्म्यूलावर आताच बंदी घातली जाणार नाही.'
बातम्या आणखी आहेत...