आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Offenders Of Mumbai Attack Should Be Punish, Obama's Warning

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, ओबामांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे सुरक्षित नंदनवन स्वीकारार्ह होणार नाही, अशा शब्दांत पाकिस्तानला इशारा देत मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच
पाहिजे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

सर्व लोकांना सुरक्षा, समृद्धी आणि सन्मान देण्यासाठी अमेरिका भविष्यातही भारताबरोबर काम करणे सुरूच राहील, असे ओबामा यांनी भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया-टुडे’ला ई-मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. दहशतवादाविरोधात अमेरिका पाकसोबत काम करत असली तरीही पाकमधील अतिरेक्यांचे सुरक्षित नंदनवन स्वीकारार्ह नाही. मुंबई हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड झकी उर रहेमान लख्वीला जामीन दिल्यानंतर भारताने पाकच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली होती.

पुढे वाचा ओबामा म्हणतात, कथनी आणि करणीत फरक नको