आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Office Time Morning 7 O'clock To 3 O'clock For Petrol Saving

पेट्रोल बचतीसाठी ऑफिस टाइम सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत, पेट्रोलियम मंत्रालयाचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलमध्ये बचतीसाठी पेट्रोलियम मंत्रालयाने सरकारला कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. सकाळी 9 ते साडेपाचऐवजी 7 ते दुपारी 3 किंवा सकाळी 8 ते सायंकाळी 4 असा ऑफिस टाइम करण्यात यावा. यामुळे सकाळ-संध्याकाळ ट्रॅफिक कमी होईल. परिणामी इंधन वापर घटेल, असे त्यात म्हटले आहे.
तेल बचतीसाठी पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी मंगळवारी महाअभियानाची घोषणा केली. एक ऑक्टोबरपासून ते सुरू होणार आहे. या काळात पेट्रोल, डिझेलचा खप 6 टक्क्यांनी घटवण्याचे उद्दिष्ट आहे. सामान्यपणे जानेवारीत 15 दिवसांसाठी ही मोहीम राबवली जाते. परंतु पुढील वर्षी निवडणुका असल्याने यंदा ती ऑक्टोबरमध्ये घेण्यात येत आहे. यावर सुमारे 45 कोटी रुपये खर्च होतील.


दुचाकी वाहने करतात
62% पेट्रोलचा वापर

देशात सर्वाधिक पेट्रोलचा वापर दुचाकी वाहनांमध्ये होतो, अशी माहिती तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन व विश्लेषण विभागाने दिली आहे. यासाठी विभागाने नील्सन कंपनीकडून सर्व्हे करवून घेतला.
वाहन दुचाकी कार तीनचाकी इतर
इंधन 62' 27' 06' 02'


सायकली वाटा, बस डे पाळा
० नगरविकास मंत्रालयाने शहरांत सायकल ट्रॅक करावेत. मोफत सायकली द्याव्यात.
०स्वयंपाकाच्या गॅसमध्ये बचतीसाठी किचन क्लिनिक देणार टिप्स.
०मंत्रालयांनी आठवड्यात एक ‘बस डे’ पाळावा. सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी बसने प्रवास करावा.
०तरुणांना वाहन चालवण्याची योग्य पद्धत समजावून द्यावी.