आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officers Health Treatment In Foreign Country By Government

अधिकार्‍यांचे परदेशातील उपचार सरकारी खर्चातून होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असतानाच आयएएस, आयपीएस व आयएफओएस (फॉरेस्ट सेवा) अधिकार्‍यांच्या परदेशातील उपचारांचा खर्च उचलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्राच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगने (डीओपीटी) 30 वर्षांपूर्वीचा नियम बदलला आहे. अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांनाही परदेशात उपचाराची सुविधा व विमान प्रवासाचा खर्च मिळेल. विभागाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून नियमाची माहिती दिली आहे. देशात 4,737 आयएएस, 3,636 आयपीएस आणि 2,700 आयएफओएस अधिकारी आहेत. परदेशात दोन महिन्यांचा खर्च दिला जाईल.