आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officeses Not Directly Closed Employee Bank Account

नियोक्त्याच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्याचे खाते बँकेला गोठवता येणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी व त्याच्या नियोक्त्यात (कंपनी, संस्था) काही कारणाने वाद झाला आणि नियोक्त्याने कर्मचाऱ्याचे खाते गोठवण्यास बँकेस सांगितले, तर बँकेला तसे करता येणार नाही. दिल्ली ग्राहक मंचाने हा निर्णय दिला आहे. मंचाने या प्रकरणी आयडीबीआय बँकला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नवी दिल्ली जिल्हा ग्राहक मंचाने तेथील रहिवासी ओमप्रकाश शर्मा यांच्या तक्रारीवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. शर्मा यांनी सांगितले, नियोक्त्याच्या सांगण्यावरून बँकने २३ ते २७ सप्टेंबर २०१० पर्यंत त्यांचे खाते न सांगता गोठवले होते.

प्रकरण असे : शर्मा यांच्या मते, नियोक्त्याने त्यांना सेटलमेंट अंतर्गत ५९ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. दरम्यान नियोक्त्याने शर्मा यांनी सही असलेला एक धनादेश चोरला असून त्यावर रक्कम टाकून शर्मा यांनी खात्यातून पैसे काढल्याचे त्यांनी बँकेला लेखी कळवले. शर्मा यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली.

बँक न्यायाधीश नाही : ग्राहक मंचाचे पीठासीन अधिकारी सी. के. चतुर्वेदी यांनी नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या वादात बँकेला न्यायाधीश बनता येणार नाही असे म्हटले आहे. हा अधिकार न्यायालय किंवा तपास करणाऱ्या पोलिसांना आहे, असेही चतुर्वेदी यांनी सुनावले. नियोक्त्याने धनादेश चाेरीची तक्रार पोलिसांत दिली नव्हती याकडे मंचाने लक्ष वेधले.