आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oil Ministry May Propose To Hike LPG Price By Rs 250 Per Cylinder

खुशखबर! गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होणार नाही, पेट्रोलियम मंत्र्यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने रेल्वेपाठोपाठ आता 'LPG बॉम्ब' फोडण्याची तयारीत आहे. आगामी काही दिवसांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याचे वृत्त झळकल्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी खुलासा केला आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ केली जाणार नसल्याची घोषणा प्रधान शुक्रवारी सायंकाळी केली. एका वृत्तवाहिनीशी बोलतांन प्रधान यांनी सांगितले.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये तब्बल अडीचशे रुपयांनी वाढ होणार असल्याची माहिती सूंत्रांनी दिली होती. त्यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली जात होती. देशाच्या अर्थव्‍यवस्‍थेला आजारातून बरे करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, श्रीमंतांना सोडून सामान्य जनतेलाच कडू औषध देण्याचा प्रकार सुरु असल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅसची किंमत प्रति सिलिंडरमागे 250 रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर रॉकेलच्या दरात चार ते पाच रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दरही मासिक 40 ते 50 पैसे प्रतिलिटर वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मा‍त्र, अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आला नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले..

(फाइल फोटो: पेट्रोलियम मंत्री धर्मेश प्रधान)

पुढील स्लाइड्‍सवर वाचा किरीट पारेख समितीच्या शिफारसी...