आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Oil Ministry Proposes To Hike LPG Price By Rs 5 Per Cylinder

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागाईची रेल्वे; गॅस सिलिंडर, रॉकेलही! सबसिडी कमी करून तूट भरून काढण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वे भाडेवाढीपाठोपाठ महागाईचे भूत आता रॉकेल व एलपीजी सिलिंडरच्या मागे लागले आहे. स्वयंपाकाचा गॅस, रॉकेलवर दिली जाणारी सबसिडी कमी करून वित्तीय तूट भरून काढण्यासाठी दर महिन्याला सिलिंडरचा दर 5 ते 10 तर रॉकेलचा दर 50 पैसे ते 1 रुपयाने वाढवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. यावर अंतिम निर्णय मात्र झालेला नाही.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गॅस आणि रॉकेलच्या दरांत वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठवला आहे. डिझेलप्रमाणेच हे दरही नियंत्रणमुक्त करण्याचा सरकारचा विचार आहे. डिझेलचा दर महिन्याला 50 पैशांनी वाढतो. त्याच प्रकारे सिलिंडर आणि रॉकेलही नियंत्रणमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावर सरकारला दर वर्षी 80 हजार कोटी रुपये सबसिडी द्यावी लागत आहे.

... तरी 7 वर्षे लागतील
पेट्रोलियम मंत्रालयाचा एलपीजी सिलिंडरचे दर नियंत्रणमुक्त करण्याचा प्रस्ताव केंद्राने मान्य केला तरी गॅसवर दिली जाणारी सबसिडी पूर्णत: रद्द होण्यास सात वर्षे लागतील. सध्या सिलिंडरमागे 433 रुपये सबसिडी दिली जाते. दर महिन्याला सिलिंडर 5 रुपयांनी महागले तरी संपूर्ण सबसिडी कमी होण्यास सात वर्षे लागतील. याच प्रकारे रॉकेलचा दर महिन्याला 1 रुपयाने वाढवत नेला तरी सबसिडी रद्द होण्यास अडीच वर्षे लागतील.
सरकारने डिझेल, पेट्रोल व एटीएफचे दर (विमानाचे इंधन) यापूर्वीच नियंत्रणमुक्त केले आहेत.

तेल उत्पादनात घट
एकीकडे देशात इंधनाची मागणी वाढत असताना एकूण तेल उत्पादन मात्र घटत चालले आहे. या वर्षी देशात कच्च्या तेलाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या 3.17 दशलक्ष टनांच्या तुलनेत 3.16 टन राहिले. सरकारी तेल कंपन्यांत उत्पादन घटले असले तरी खासगी कंपन्यांत मात्र 3.1 टक्के वाढ झाली आहे.

गोदामे भरलेली, तरी साखर महागली
सरकारने आयात शुल्क 15 वरून 40 टक्के केल्याने मंगळवारी देशात साखर 2 रुपयांनी महागली. साखरेचा पुरेसा साठा असल्याचे अन्नपुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी जाहीर केले होते. साखर आणखी महागणार असल्याच्या शक्यतेमुळे व्यापार्‍यांनीही साठेबाजी सुरू केली आहे. यानंतरच भाववाढ झाली.


थोडा दिलासाही.. महिलांना मिळणार विशेष करसवलत

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या कठोर निर्णयांनी हादरलेल्या जनतेला पहिल्या-वहिल्या अर्थसंकल्पात दिलासा मिळू शकतो. यात महिलांना विशेष करसवलत मिळू शकते. पुरुषांसाठी 3 लाख तर नोकरदार महिलांसाठी ही करसवलतीची मर्यादा 3.25 ते 3.50 लाख केली जाऊ शकते.

बुलेट ट्रेनची भेटही शक्य : रेल्वे अर्थसंकल्पात ताशी 300 किमी तर सध्याच्या मार्गांवर अतिजलद रेल्वेची घोषणा शक्य.

‘80 सी’ ची मर्यादा दीड लाख : प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 क (सी) ची मर्यादा 1 वरून दीड लाख होऊ शकेल. यात इन्फ्रा बाँड व आरोग्य विम्याचा समावेश, तसेच या बाँडमधील गुंतवणूक मर्यादा 20 हजारांवरून 30 हजार होऊ शकते.