आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oil Prices Drop As Iran, West Reach Framework On Nuclear Agreement

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात घसरण, इराणकडून अणुकरारास सहमती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इराण आणि पश्चिमेकडील देशांत झालेला आण्विक करार भारतासाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. समझोता झाल्याचे जाहीर होताच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होण्याची चिन्हे आहेत. ब्रेंट क्रूडचे दर पाच टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

स्वित्झर्लंडमध्ये आठ दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर इराणच्या वादग्रस्त अणू कार्यक्रमासंबंधी तयार करण्यात आलेल्या आराखड्यावर दोन्ही बाजूने सहमती झाली आहे. प्रस्तावित कराराच्या मुसद्यानुसार इराण आपली युरेनियम संवर्धन क्षमता कमी करेल. त्या बदल्यात इराणवरील निर्बंध हटवण्यात येतील.
वास्तविक इराणसोबतच्या व्यापक सहमतीसाठी ३० जूनची डेडलाइन देण्यात आली होती. सर्वात अगोदर इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद जरीफ यांनी टि्वट करून तोडगा काढण्यात आल्याची माहिती जाहीर केली. स्वित्झर्लंडच्या लुसाने शहरात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. चर्चेत इराण, ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, चीन, रशिया, जर्मनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
ऐतिहासिक करार : ओबामा

आण्विक कराराच्या आराखड्यावर इराण आणि चर्चेतील देश यांच्यात झालेली सहमती म्हणजे ‘ऐतिहासिक करार’ आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. मध्य-पूर्वेत ‘आणखी एक युद्ध’ होण्यापेक्षा हा करार चांगला आहे, असे ओबामा म्हणाले.
आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतींवर आणखी दबाव वाढू शकतो. नायमॅक्सवर कच्चे तेल ४५ डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड ५२ डॉलर खाली येऊ शकेल.-डॉ. रवी सिंह, रिसर्च हेड, एसएमसी.