नवी दिल्ली- विमानातून प्रवास करताना छेड काढणाऱ्या 60 वर्षीय म्हाताऱ्या बिझनेसमनला 32 वर्षीय तरुणीने चांगलीच अद्दल घडवली आहे. संबंधित प्रकार इंडिगो या विमानात घडला. म्हातारा तरुणीच्या मागच्या सिटवर बसला होता. समोरच्या सिटवर बसलेल्या तरुणीची या म्हाताऱ्याने वारंवार छेड काढली. दरम्यान, त्याने अनावधानाने चुक झाल्याचे कबुल केले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दिल्ली-भुवनेश्वरच्या इंडिगो फ्लाईटमध्ये 27 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. या तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यावर आरोपी बिझनेसमनला ताब्यात घेण्यात आले. आयपीसी कलम 354 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध झाल्यास त्याला किमान सात वर्षांसाठी शिक्षा होऊ शकते.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेनंतर महिलेले या बिझनेसमनला कसे झापले... त्यानेही चुक झाल्याचे कबुल केले...