आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुनी वाहने मोडीत काढा; नंतर नव्यांची नोंदणी करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर दिल्ली महापालिकेने नऊ वर्षांपूर्वीची जुनी वाहने नष्ट केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच तिथे दहा नव्या वाहनांची नोंदणी करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने परिवहन कार्यालयास दिले. न्या. स्वतंत्रकुमार यांच्या अध्यक्षतेखालील लवादाने महापालिकेस सांगितले की, नव्या वाहनांच्या नोंदणीसाठी नष्ट केलेल्या जुन्या वाहनांची छायाचित्रे व चेसिस क्रमांक संबंधित कार्यालयास सादर करावेत. संबंधित अटीची पूर्तता केल्यानंतर नवीन दहा डिझेल वाहनांची नोंदणी होऊ शकेल. जुन्या वाहनांबाबतचा पुरावा सादर केल्यानंतरच नव्यांची नोंदणी होईल, असे लवादाने स्पष्ट केले.

जंतुनाशक फवारणीसाठी बीएस-चार मानकानुरूप दहा नव्या वाहनांची खरेदी करण्यासाठी महापालिकेने एनजीटीकडे संपर्क साधला होता. लवादाने आदेशात म्हटले की, संबंधित वाहनांचा उपयोग जंतुनाशक फवारणीसाठी किंवा सार्वजनिक आरोग्य व आवश्यक पर्यावरण संरक्षणासाठी केला जाऊ शकतो. त्याआधी लवादाने दहा वर्षे जुनी डिझेल वाहने नष्ट करण्यास सांगितले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही २ हजार सीसीपेक्षा जास्त डिझेल एसयूव्हीच्या नोंदणीवर बंदी लादली होती. आता परिवहन विभागाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...