आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक, यूट्यूबवर पॉप्युलर झाले OLX चे नवे जाहिरात कॅम्पेन, अनेकांनी शेअर केले स्वत:चे अनुभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - विश्वचषकातील रोमांच जसा-जसा पुढे सरकत आहे तसे त्याच्याशी संबंधीत माहिती इंटरनेटवर सर्वाधिक ट्रेंड करत आहे. आम्ही तुम्हाला क्रिकेटशी संबंधीत अशाच एका व्हिडिओ अॅडबद्दल सांगणार आहोत. सध्या ही जाहिरात फेसबुक, यूट्यूब तसेच व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर सर्वाधिक पॉप्युलर झाली आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओ संबंधीत स्वत:चे अनुभव पब्लिकली शेअर करत आहेत. ते सांगत आहेत की, OLX ने एक कॅम्पेन अंतर्गत ही व्हिडियो अॅड रीलिज केली आहे. ज्याची पंच लाइन 'कीमत भी, कुछ कीमती भी' अशी आहे. या व्हिडिओची थीम क्रिकेट असून यामध्ये दाखवण्यात आले आहे की, 'जर तुम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतला तर, तुटणारे एक स्वप्न दुस-याच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहू शकता.
आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, ही जाहिरात रीलिज झाल्यानंतर थोड्याच दिवसात यास यूट्यूबवरून 3 लाख 31 हजारांपेक्षा अधिक यूजर्सने पाहिले आहे. तर फेसबुकवर यास 7 हजारांपेक्षा अधिक युजर्सने लाइक केले आहे. तसेच 1700 पेक्षा अधिक युजर्सने यास शेअर केले आहे. फेसबुकवरील शेकडो यूजर्सने या टची व्होडिओ संबंधी स्वत:चा अनुभव शेअर केला आहे. अशीच एक एफबी यूजर नीलम सांगते की, ही अॅड मला खुप टची वाटली. या अॅडच्या कॅरेक्टरमध्ये मी माझ्या भावाला पाहात होते. काही कारणांमुळे त क्रिकेट खेळू शकला नाही पण त्याची बॅट आजदेखील त्याच्या रूममध्ये ठेवलेली आहे.
क्रिकेटवर आधारित OLX च्या या कॅम्पेनमध्ये 'उडता-पडता गिरता आया, अंधेरे को चीर न पाया, खामोश वो टूटता तारा' गाण्याचा 3 मिनट 58 सेकंदाच्या लांब व्हिडिओमध्ये तुटता तारा एक असा युवक आहे ज्याला क्रिकेटला आपले आयुष्य बनवण्याची इच्छा आहे. परंतु, काही कारणांमुळे त्याला एका अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. तो त्याच्या वडिलांना जे मार्बलचे व्यापारी आहेत त्यांना एका व्यक्तीसमोर हात जोडताना पाहतो व मनाशी पक्क ठरवून टाकतो की, त्याच्या स्वप्नापेक्षा मोठी जबावदारी ही त्याच्या कुटुंबाची आहे. तो निर्णय घेतो की, क्रिकेट ऐवजी तो वडिलोपार्जित व्यावसायाला स्वत:चे आयुष्य बनवेल. यासाठी तो अनेकवेळा स्वत:च्या स्वप्नला, बॅट पडण्याच्याके त्याने स्विच बंद करण्याच्यावेळी तुटतांना पाहत असतो. एक दिवस तो त्याच्या स्वप्नाला नष्ट करण्याचे ठरवतो.
पण त्याचवेळी तो एक निर्णय घेतो की, मी तर माझे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही पण, कोणी दुसरा तर आहे जो माझ्या माध्यमातून स्वत:चे स्वप्न पूर्ण करू शकतो. याचवेळी चित्रपटामध्ये एक क्रिकेट स्टेडियमचा सीन दिसतो. त्यामध्ये लोकल क्रिकेट मॅचमध्ये एक बॅट्समन पाठोपाठ सुंदर शॉट्स खेळताना दाखवण्यात येतो. या खेळाडूला मैदानाच्या चारही दिशांना शॉट्स लावताना पाहून त्या युवकाच्या चेह-यावर हसू उमटते. जसे की तो स्वत:च खेळत आहे. प्रत्येक शॉटसोबत तो टाळी वाजवून स्वत:चा आनंद साजरा करतो आणि विचार करतो की, चला 'माझ्या नाही तर कुणा दुस-याच्या तर कामाला आला ' मॅच संपल्यानंतर उत्तम खेळ करणा-या त्या युवकापाशी तो पोहोचतो आणि त्याचे आभार मानतो. फ्लॅशबॅकमधून कळते की, या युवकाने बॅट तोडण्याऐवजी ती OLX वर विकण्याचा निर्णय त्याने घेतला होता आणि त्याच बॅटने तो बॅट्समन एका पाठोपाठ एक अशे भन्नाट शॉट्स लावत होता. तसे पाहिले गेले तर पूर्ण व्हिडिओ हा सरळ-सरळ ह्यूमन इंटरॅक्शनशी संबंधीत जोडलेला आहे. या व्हिडिओच्या लोकप्रियतेचे एक कारण असे देखील मानले जाऊ शकते की, यामध्ये लोक स्वत:ला इमॅजिन करत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा आणखी एक फोटो...