आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रपतींंनी काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी - आेमर अब्दुल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अशांत काश्मीरप्रश्नी राजकीय तोडगा काढण्यात यावा, त्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती जम्मू-काश्मीरमधील शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे शनिवारी केली.

माजी मुख्यमंत्री आेमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी मुखर्जी यांची भेट घेतली. राज्यातील समस्येवर राजकीय तोडगा काढणे गरजेचे आहे. काश्मीरच्या समस्येचे स्वरूप जवळपास राजकीय आहे. राज्यातील स्थिती अत्यंत वाईट बनली आहे. त्यामुळे आपल्या हस्तक्षेपाची गरज आहे. नागरिकांच्या विरोधातील लष्करी कारवाईला थांबवण्यासाठी राष्ट्रपतींनी आपल्या प्रभावाचा वापर करावा. त्याचबरोबर केंद्रानेही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आेमर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. केंद्र सरकार हा प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यातून मार्ग काढण्याची विनंती त्यांना केली आहे. दरम्यान, ्््आेमर यांनी याच आठवड्यात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. राज्यात गेल्या ४३ दिवसांपासून संचारबंदी आहे. त्याचा परिणाम पेट्रोल, रुग्णवाहिका यासारख्या अत्यावश्यक गोष्टींवर पडू लागला आहे. त्यातून नवीन समस्या तयार होत आहेत. आेमर यांच्यासोबत माकपचे एम.वाय. तारिगामी, काँग्रेसचे खासदार जी.एस.मीर, आमदार हकिम यासिन हे नेतेही शिष्टमंडळात होते. सलग एक महिन्याहून अधिक दिवस एखाद्या राज्यात संचारबंदी लागू राहण्याची ही देशातील पहिलीच वेळ अाहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अस्वस्थता व्यक्त होत आहे.

काही जिल्ह्यांत संचारबंदी
जम्मू-काश्मीरमधील काही जिल्ह्यांत सलग ४३ व्या दिवशीही संचारबंदी लागू होती. ८ जुलै रोजी हिजबुलचा कमांडर बुरहान वानी ठार झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हिंसाचाराला सुरुवात झाली होती. त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काही भागातील संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. हिंसाचारात आतापर्यंत ६४ जणांचे प्राण गेले आहेत. फुटीरवादी नेत्यांनी मोर्चा काढण्याचा शनिवारी प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
बातम्या आणखी आहेत...