आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक संघवी सनी लिओनला म्हणाले रिजेक्टेड, उमर अब्दुल्लांनी घेतला आक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॉलिवूड अॅक्ट्रेस आणि पोर्न स्टार सनी लिओनवरुन दोन दिग्गज नेत्यांमध्ये ट्विवटिवाट सुरु झाला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सनीबद्दल केलेल्या ट्विटवर टिप्पणी केली आहे. उमर म्हणाले, 'मला वाटले होते की हे बनावट अकाउंट आहे, पण ते त्यांचे स्वतःचेच अकाउंट आहे. त्यांना असे ट्विट करण्याची काय गरज होती?'
अभिषेक संघवींनी ट्विट केले होते, 'आपणाला सतर्क राहिले पाहिजे की सनी लिओनसारखी पाश्चात्य देशात रिजेक्ट झालेल्यांना भारतीय संस्कृतीचे प्रतिक आणि बॉलिवूड आयकॉन बनू दिले नाही पाहिजे.'
सनीचा एक पहेली लीला हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट राजस्थानच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. सनी एका राजस्थानी महिलेच्या भूमिकेत आहे. पहिल्या दिवशीया चित्रपटाला चांगले ओपनिंग मिळाले नाही. मल्टिप्लेक्समध्ये शुक्रवारी सकाळी फक्त 20 टक्के सीट बुक होते. तर, फिल्म ट्रेड एक्सपर्ट कोमल नाहटा यांनी ट्विट केले आहे, की मल्टिप्लेक्सच्या तुलनेत सिंगल स्क्रिनवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सनी लिओन अमेरिकेत पोर्नस्टारचे काम करत होती. काही वर्षांपूर्वी रियलिटी शो मधून तिची भारतात एन्ट्री झाली. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात ती झळकू लागली.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, 10 कोटींमध्ये तयार झाला 'एक पहेली लीला'