आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Omprakash Chutala Surrender, Delhi High Court Order

चौटाला, आत्मसमर्पण करा : दिल्ली उच्च न्यायालयाने बजावला आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आजारपणाच्या नावाखाली जामीन घेऊन निवडणूक प्रचारात उतरलेले हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी शनिवारपर्यंत हजर व्हावे, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बजावले आहेत.

इंडियन नॅशनल लोकदलाचे (आयएनएलडी) प्रमुख चौटाला यांच्यावर शिक्षक भरतीचा आरोप असून या प्रकरणात त्यांना १० वर्षांची शिक्षा झाली आहे. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावल्यानंतर ते तिहार तुरूंगात होते. शिक्षेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने आजारपणामुळे त्यांना जामीन मंजूर केला होता; परंतु सीबीआयने त्याविरोधात याचिका दाखल केली होती.