आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाच्या मुद्द्यावर माघार घेण्याचीही तयारी : बैजल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात तणाव होता. आता अनिल बैजल नवे नायब राज्यपाल नियुक्त झाले. शनिवारी शपथग्रहण केल्यानंतर बैजल यांनी दैनिक भास्करला पहिली मुलाखत दिली. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशी संबंध, दिल्लीच्या समस्यांवर अनिल बैजल यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे.  

आता तुमचे पुढील उद्दिष्ट कोणते असेल?  
दिल्लीत अनेक समस्या आहेत. परंतु राजधानीच्या शहरातील वाढते प्रदूषण, वाहतूक, महिलांची सुरक्षा, स्वच्छता आणि कायदे विकास या मुद्द्यांना प्राधान्य आहे. या समस्या दूर करण्याचा माझा प्रयत्न राहील. यासाठी ज्यांच्या मदतीची गरज लागेल ती मी घेईनच. माघार घेणार नाही. 
 
जुने संबंध चांगले नव्हते. पण नव्या उपराज्यपालांचे दिल्ली सरकारशी नाते कसे राहील?  
मुद्द्यावर दिल्ली सरकारचे आणि उपराज्यपालांचे विचार वेगळे असू शकतील. परंतु दोघांचे उद्दिष्ट दिल्लीचा विकास करण्याचे असेल. जर मुद्दे अधिक स्पष्टपणे मांडता आले, एकमेकांनी ते समजूनही घेतले तर मतभेद होण्याचे कारण नाही. आम्ही अशी यंत्रणा विकसित करू की दोघांनाही आपली बाजू मांडता आली पाहिजे आणि एका मुद्द्यावर सहमती होऊन मार्ग निघायला हवा. 
 
केजरीवाल तर म्हणतात, मोदी सरकारकडून मदत मिळत नाही. आता तुम्ही केंद्राचे प्रतिनिधी आहात, मग यात तुमची भूमिका कशी असेल?  
दिल्लीच्या विकासात येणारे अडथळे दूर करण्याची माझी भूमिका असेल. यासाठी गरज वाटल्यास केंद्राशी मी बोलणी करेन आणि वेळप्रसंगी मुख्यमंत्री केजरीवाल किंवा संबंधित मंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन थेट त्यांच्याशी चर्चा करेन. उपराज्यपाल या नात्याने कोणत्याही विकासकामासाठी थोडीफार माघार घेण्याची माझी भूमिका असेल. यासाठी मी आनंदाने तयार असेन.
  
दिल्लीची सर्वात मोठी समस्या वाहतूक आणि महिला सुरक्षेसंबंधी आहे. यात आपले धोरण कसे असेल?  
महिलांना सुरक्षा देणे माझी प्राथमिकता आहे. दिल्लीतील डार्क स्पॉट ओळखणे आणि तेथे सुरक्षा व्यवस्था तैनात करणे याचाही समावेश आहे. याशिवाय निर्मनुष्य स्थळी पोलिसांची गस्त कायम राखणे, कालबद्ध कार्यक्रमानुसार नागरी तक्रारी दूर करणे, पोलिसांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे यासाठी माझे प्रयत्न राहतील.
  
आतापर्यंत लोकांच्या तक्रारींची दखल उपराज्यपालांच्या कार्यालयात घेतली जात नसे...  
आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करू. तंत्रज्ञानामुळे तक्रारींचा पाठपुरावा केला जाईल. प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी वेळेत जुन्या अपडेट मिळाव्यात. जर एखादी समस्या सुटली नाही तर त्या व्यक्तीने कुणाची मदत घ्यावी, हे ठरवणे बाकी आहे. यासाठी आम्हाला जनता आणि माध्यमांचे सहकार्य हवे आहे.
बातम्या आणखी आहेत...