आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हीतर पहिल्यापासून धर्मांतराच्या विरोधात, कठोर कायद्याची गरज - व्यंकय्या नायडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुस्लिम कुटुंबांच्या कथित धर्मांतराचा मुद्दा लोकसभेत दुसर्‍या दिवशीही विरोधकांनी लावून धरला. गुरुवारी विरोधकांनी या मुद्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे अशी मागणी केली. लोकसभेत या मुद्यावरुन गदारोळ झाल्यानंतर संसदीय कार्य आणि नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात निवेदन केले. ते म्हणाले, 'आम्ही तर लहानपणापासून धर्मांतराच्या विरोधात आहोत. हे गंभीर प्रकरण आहे. यावर राजकारण करु नये.' नायडूंनी सर्व पक्षांनी या मुद्यावर सांगोपांग चर्चा करुन यासंबधी कठोर कायदा झाला पाहिजे यावर जोर दिला.
सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रीय जनता दल आणि सीपीएमचे सदस्य वेलमध्ये आले आणि 'मोदी सरकार होश में आओं', 'हिंदू मुस्लिम भाई-भाई' अशा घोषणा देऊ लागले. सभागृहातील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे या मुद्यावर चर्चेची मागणी केली. मुलायमसिंह यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. या गदारोळामुळे 10 मिनीट सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाजाला पुन्हा एकदा गदारोळात सुरुवात झाली.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, नथुराम गोडसेच्या नावावर गोंधळ, दलवाईँनी उपस्थित केला गोडसेचा मुद्दा