आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालाच्या दिवशी मोदी यांनी पाहिला नव्हता टीव्ही, पत्रकार लान्स प्राइस यांच्या पुस्तकातील दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी नरेंद्र मोदी एका खोलीत एकटेच ध्यानमग्न होते. देशभरातील नागरिक टीव्हीसमोर असताना मोदी यांनी मात्र टीव्ही पाहिला नाही. सकाळपासून एकटे असलेले मोदी दुपारी ध्यानातून बाहेर आले होते, असा गौप्यस्फोट एका पुस्तकातून करण्यात आला आहे.

‘द मोदी इफेक्ट : इनसाइड नरेंद्र मोदीज कॅम्पेन टू ट्रान्सफॉर्म इंडिया’ या लान्स प्राइस लिखित पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. प्राइस हे बीबीसीचे माजी पत्रकार तथा तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे माजी मीडिया सल्लागार होत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी चार वेळा मोदी यांची भेट घेतली होती.

आपल्या पुस्तकात लान्स यांनी अनेक मुद्द्यांवर मोदी यांचे विचार काय आहेत, याचा ऊहापोह केला आहे. त्या वेळी वाराणसी मतदारसंघात मोदी विरुद्ध केजरीवाल हा सामना सर्वाधिक लक्षवेधी ठरला होता. केजरीवालांनी ‘राजकीय भूकंपा’ची ग्वाही दिल्यानंतर राजकीय आखाडा आणखीनच तापला होता, परंतु मोदी यांनी मौन ठेवले होते. प्रतिक्रिया देताना मात्र त्यांनी स्फोटक विधाने केली होती.

पुढे वाचा.. केजरीवाल छोटे स्थानिक नेते