नवी दिल्ली - पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये LOC (लाइन ऑफ कंट्रोल) ला लागून असलेल्या भागांमघ्ये सलग दुसऱ्या दिवशीही फायरिंग केली. त्यात रविवारी सकाळी एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
सीमेच्या पलिकडून पुंछच्या मेंढर सेक्टरच्या बालाकोट परिसरातील अनेक गावांना लक्ष्य करण्यात आले असून गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या फायरिंगमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या फायरिंगमध्ये 120 एमएम मोर्टारसह अनेक मोठ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. फायरिंगमुळे पुंछच्या सांदाकोट, बसूनी, बरूटी अशा गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मृतांमध्ये बहुतांश याच गावातील आहेत. सलग सुरू असलेल्या फायरिंगमुळे लोकांना गाव सोडून पळण्याची वेळ आली आहे. लष्करानेही स्थानिकांना गाव सोडण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी रात्री उशीरापासूनच पाकिस्तानी रेंजर्सने अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
संरक्षण तज्ज्ञांचे मत...
संरक्षण तज्ज्ञ पीएन हून म्हणाले की, मला वाटते आता प्रतिहल्ला करण्याचे धोरण अवलंबायला हवे. मी या फायरिंगमध्ये मारल्या गेलेल्या गावकऱ्यांसाठी संरक्षण मंत्रालयाला जबाबदार मानतो. त्यांच्याकडे याबाबत काहीच नियोजन नाही का ?
लष्करानेही दिला इशारा
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फायरिंगपासून संरक्षण व्हावे यासाठी गावकऱ्यांनी सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा लष्कराकडूनही देण्यात आला आहे. एक स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार लष्कराने बालकोटाच्या अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे.
मृतदेह उचलायलाही बाहेर येईना
पाकिस्तानकडून लगातार होत असलेल्या फायरिंगमुळे लोक घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत. एका रहिवाशाने सांगितले की, सीमेवर झालेल्या फायरिंगमध्ये लोक लोक मारले जात आहेत. लोकांमध्ये एवढे भितीचे वातावरण आहे की, घराबाहेर पडलेले मृतदेह उचलण्यासाठी बाहेर यायलाही कोणी धजावत नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS