आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात एक लाख पासपोर्ट केंद्रांचा प्रस्ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नागरिकांना पासपोर्ट तयार करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी विदेश मंत्रालयाचा देशभरात एक लाख पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याचा विचार आहे. मंत्रालयाने या प्रस्तावावर काम सुरू केले असून ही केंद्रे कार्यान्वित करण्यासंदर्भात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाशी करार केला जाणार आहे. या करारानुसार कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू केले जातील. या केंद्रांवर 100 ते 125 रुपये शुल्क भरून अर्जदार पासपोर्ट प्राप्त करू शकेल. खासगी सार्वजनिक भागीदारीतून देशातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच गावांसाठी एक केंद्र उघडले जाणार आहे.

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी करार केल्यानंतर यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती मंत्रालयातील एका अधिका-याने दिली. या केंद्रांमार्फत नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखला, घर नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना यासह इतर आवश्यक प्रमाणपत्रांची नक्कल (दुसरी प्रत) उपलब्ध देण्याचाही केंद्राचा विचार आहे.