आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त "आकाश' योजना बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एक लाख टॅब्लेट विक्रीचा पल्ला पूर्ण केल्यानंतर स्वस्तातील आकाश टॅबची योजना बंद करण्यात आली असल्याची माहिती आरटीआयमधून मिळाली आहे.
२०११ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी स्वस्त दरात आकाश टॅब उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली होती. मुंबई आयआयटीच्या मदतीने सुरू करण्यात आलेली ही योजना ३१ मार्च २०१५ रोजी बंद करण्यात आली आहे. आता भविष्यात तीच योजना परत आणण्यासंबंधी एनडीए सरकारचा विचार नसल्याची माहिती आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीमध्ये नमूद आहे. दरम्यान, राजस्थानच्या आयआयटीने या योजनेत रस दाखवला होता. मात्र, नंतर त्यासंबंधीचा प्रस्ताव त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे परत पाठवला. या योजनेसाठी एकूण ४७ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, आकाश टॅबबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रार होत्या. त्या सोडवण्यासाठी देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ३०० आकाश केंद्रे सुरू करण्यात आली होती.