आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Leader Stupied, Another Murderer, Music Composer Vishal Dadalani Controversial Tweet

‘एक नेता मूर्ख, दुसरा खुनी’, संगीतकार विशाल ददलानी यांचे वादग्रस्त ट्विट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संगीतकार विशाल ददलानी यांनी केलेले वादग्रस्त ट्विट आपल्या पेजवर टाकून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा वादात अडकले आहेत. ददलानी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, ‘एक मूर्ख आणि दुसरा खुनी यात अडकलो आहोत.. आता देश करणार काय?’
केजरीवाल यांच्या ट्विटकडे राहुल गांधी आणि मोदींचा संदर्भ लावून पाहिले जात आहे. सोमवारी रात्री राहुल यांच्या एका वाहिनीवर झालेल्या मुलाखतीनंतर ददलानी यांनी ट्विट केले होते. थोड्या वेळाने केजरीवाल यांनी तेच ट्विट आपल्या पेजवर टाकले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात ददलानी यांनी आम आदमी पार्टीचा प्रचार केला होता.
भाजपकडून निषेध : भाजपचे प्रवक्त्या निर्मला सीतारमन यांनी केजरीवाल यांच्या ट्विटचा तीव्र निषेध केला. जाहीररीत्या काही भाष्य करण्यापूर्वी मुख्यमंत्री या नात्याने केजरीवाल यांनी दहा वेळा विचार करायला हवा होता, असे त्या म्हणाल्या.
केजरीवाल, भारतींना नोटीस
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात केलेल्या खर्चाच्या हिशेबावरून दिल्ली हायकोर्टाने मुख्यमंत्री केजरीवाल व कायदामंत्री सोमनाथ भारती यांना नोटीस बजावली आहे. दोघांवर प्रचारकाळात 14 लाखांहून अधिक रक्कम खर्च केल्याचा आरोप आहे. भाजपचे विजेंद्र गुप्ता आणि आरती मेहरा यांनी याबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे.