आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • One Of The Accused Had Raped Mumbai Photojournalist Twice

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई गँगरेपः आरोपींच्‍या मोबाईलमधून \'ते\' फोटो नष्‍ट करण्‍याची पीडितेची विनंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - मुंबई गँगरेप प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्‍यात आली आहे. चौथ्‍या आरोपीला रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. त्‍यानंतर पाचव्‍या आरोपीला दिल्‍लीत अटक करण्‍यात आली. पाचवा आरोपी सलीम अन्सारी याला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्लीत अटक केली. काल सायंकाळी तिस-या आरोपीला अटक करण्‍यात आली. आज पहाटे 4.15 वाजताच्‍या सुमारास पोलिसांनी चौथ्‍या आरोपीला पकडले. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या आरोपीने पीडित महिला छायाचित्रकारावर दोन वेळा बलात्‍कार केला होता. बलात्‍कार करणा-या पाचही आरोपींपैकी हा सर्वात वयस्‍क आहे. कासिम बंगाली असे त्याचे नाव आहे.

दरम्‍यान, एक आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या आजीने केला आहे. मोहम्‍मद अब्‍दुल असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्‍याचे वय 19 वर्षे नोंदविले आहे. त्याच्‍या आजीने सांगितले, की पोलिसांनी त्याला अटक केली नसून मी स्वतः त्याला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. एवढेच नाही तर, आरोपीच्या आजीने दावा केला आहे, की ज्यावेळी घटना घडली तेव्हा तो तिथे उपस्थित नव्हता. मात्र, त्यांनी मान्य केले आहे, की त्याच्या मित्रांनी त्याला शक्ती मिलमध्ये बोलावून घेतले होते. तिथे तरुणीवर बलात्कार होत असल्याचे पाहिल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. तो अल्पवयीन असल्याता दावा करणा-या त्याच्या आजीने जन्माचा दाखलाही माध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवला आहे. त्यात जन्मतारखेच्या ठिकाणी खाडाखोड करण्यात आलेली आहे.

पीडित तरुणीचे मोबाईलवरुन काढले होते फोटो, वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..