आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Prisoner Died In Tihar Jail Attacked By Four Prisoners

तिहार तुरुंगात कैद्याची चार कैद्यांकडून हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील तिहार तुरुंगात मंगळवारी रात्री एका कैद्याची चार कैद्यांनी हत्या केली. पैसे देण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दीपक असे हत्या झालेल्या कैद्याचे नाव आहे. सतपाल बेदी, मनप्रीत सिंग, रियाझ आणि सूरज या चार कैद्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती, पण ती पूर्ण करण्यास दीपकने नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या या चार कैद्यांनी खिडकीच्या लोखंडी गजांनी दीपकला बेदम मारहाण केली. दीपकचा रुग्णालयात रात्री मृत्यू झाला.
या घटनेची चौकशी करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाने दिले आहेत.