आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंतरमंतरवर ठरेल रणनीती; माजी सैनिकांचे आंदोलन, समान रँक समान निवृत्तिवेतनाची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाला- समान रँक समान निवृत्तिवेतनाच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी ४९ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. याच मागणीसाठी अनेक माजी सैनिकांनी शहरातील पॉलिटेक्निक चौकात उपोषण सुरू केले आहे. मात्र, ४९ दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू असूनही याकडे
सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलक संतापले आहेत. या आंदोलकांना मार्गदर्शन करताना कॅप्टन गुलजार सिंह म्हणाले, न्याय्य मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही सरकार या माजी सैनिकांच्या संयमाचा अंत पाहत आहे. समान रँक समान निवृत्तिवेतनाच्या मागणीबाबत सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. वॉरंट ऑफिसर टी. एस. बिंद्रा म्हणाले, जंतरमंतरवरच या आंदोलनाची दिशा ठरेल.
बातम्या आणखी आहेत...