आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामुला : एका दहशतवाद्याला कंठस्नान, दोघांचा शोध सुरू; मोठा शस्त्रसाठा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - येथील बारामुला जिल्ह्याच्या हरितार ताराजूमध्ये सेक्युरिटी फोर्सेसने एन्काऊंटरमद्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. तर इतर दोन दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाली आहे. मृत दहशतवाद्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. एन्काऊंटर अजूनही सुरू असून दोन दहशतवाद्यांचा शोसुरू असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी 29 डिसेंबरला झालेल्या एन्काऊंटरमध्ये दोन जवान जखमी झाले होते. 

पेट्रोलिंगवर केला होता दहशतवाद्यांनी हल्ला 
- 29 डिसेंबरला उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्याच्या हाजिन परिसरातील शाहगुंड गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर 19 राष्ट्रीय रायफल्स, एसओजी आणि पोलिसांनी सकाळी गावात नाकाबंदी केली होती. 
- दहशतवाद्यांना माहिती मिळताच त्यांनी सुरक्षा दलांवर फायरिंग सुरू केले. या हल्ल्यात दोन जवानही जखमी झाले होते. 
- सेक्युरिटी फोर्सेसनेही प्रत्युत्तरात कारवाई केली एन्काऊंटरमध्ये लष्कराचे नायक मदन सिंह आणि शिपाई एच कृष्णा जखमी झाले होते. 

दहशतवादी कारवाईत गेल्या वर्षात 60 जवान शहीद
- डिफेंस मिनिस्ट्रीच्या मते, सीजफायर व्हॉयलेशन आणि एन्काऊंटर तसेच बॉर्डरवरील प्रत्युत्तराच्या कारवाईत 2016 मध्ये भारताचे 60 जवान शहीद झाले. 
- त्यापूर्वी 2015 मध्ये 33 जवान शदीह झाले होते. 2014 मध्ये हा आकडा 32 होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...