आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्टसाठी ऑनलाइन पोलिस व्हेरिफिकेशन, ई-रिटर्नसाठी आता ‘वन टाइम पासवर्ड’ सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नव्या धोरणांतर्गत आता पासपोर्ट बनवणे किंवा नूतनीकरणासाठी पोलिस पडताळणी (व्हेरिफिकेशन) आॅनलाइनच हाेईल. यामुळे पासपोर्ट २० दिवसांऐवजी आठवड्याच्या अात तयार होईल. गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनुसार, यंदा नोव्हेंबरपासून हे धाेरण येऊ शकते. यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना आधार, मतदान ओळखपत्र आणि नॅशनल पाॅप्युलेशन रजिस्ट्रारचे (एनपीआर) डाटाबेसचा अॅक्सेस दिले जाईल. डाटाबेसची माहिती गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क यंत्रणेच्या (सीसीटीएनएस) माध्यमातून उपलब्ध होईल.