आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटी दिल्लीत एक वर्षाचे एम.टेक.

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीमधून विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनसह चार वर्षांच्या बी.टेक.नंतर एक वर्षांचे एम.टेक. करता येणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्षामध्ये (2013-14) नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. आतापर्यंत एम.टेक. दोन वर्षांचा अभ्यासक्रम होता. परंतु त्यात सुधारित अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. बी.टेक.च्या पदवीसोबत विशेषीकरणाची पदवीदेखील दिली जाणार आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्लेसमेंटच्या वेळी तज्ज्ञ अभियंत्यांची भरती करता येणार आहे. विद्यार्थ्यांना बी.टेक. मधील स्पेशलायझेशनच्या आधारावर पुढील वर्षीच्या एम.टेक.साठी प्रवेश मिळणार आहे. त्याला एक वर्षाचे एम.टेक. करता येणार आहे.
पदवीअंतर्गत अभ्यासक्रमाचा आढावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आयआयटी दिल्लीचे अकॅडमिक अधिष्ठाता प्रोफेसर अनुराग शर्मा यांनी दिली. नवीन अभ्यासक्रम 2013 मध्ये लागू होणार आहे. आयआयटीच्या 11 बी.टेक. अभ्यासक्रमात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना 180 ऐवजी 145 ते 150 क्रेडिट दिले जाणार आहेत. त्याशिवाय 15 युनिट्ससाठी डिझायनिंग, संवाद कौशल्य, भाषा, सामाजिक सक्रियता या घटकांचा समावेश असेल. त्याला अभ्यासक्रमाचे नॉन ग्रेडिंग कोर कम्पोनंट्स म्हटले जाईल. यातून विद्यार्थ्यांमधील तणाव कमी होईल. त्याचबरोबर विद्यार्थी अभ्यासेतर उपक्रमात सहभागी होऊन मू्ल्याधिष्ठित शिक्षणही घेऊ शकतील. आता एम.टेक. च्या 37 अभ्यासक्रमांच्या जुन्या पदव्यांनादेखील बाजारपेठेतील मागणीनुसार बदलण्यात येत आहे. स्पेशलायझेशननुसार पदवीची नावे निश्चित केली जाणार आहेत.

काय फायदा होणार ?

विद्यार्थी बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रवेश घेत असेल आणि त्याला कॉम्प्युटरचा अभ्यास करून त्यात स्पेशलायझेशन करता येऊ शकेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार्‍या विद्यार्थ्यांना रोबोटिकचा अभ्यास करून त्यात स्पेशलायझेशन करण्याची संधी नवीन अभ्यासक्रमामुळे मिळणार आहे. त्यात 20-20 गुणांचे दोन प्रकल्प असतील. पहिले गुण विभागाच्या व दुसरे बी.टेक.सोबत विद्यार्थ्यांच्या स्पेशलायझेशनमध्ये दिले जातील.