आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ongress To Ask Workers To Contribute Rs 250 Annually

सत्‍तेबाहेर जाताच कॉंग्रेसचे निघाले दिवाळे; गल्‍ली ते दिल्‍ली फि‍रवणार झोळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देश स्‍वातंत्र्यानंतर अधिक काळ सत्‍तेत असलेल्‍या काँग्रेसचे सत्‍तेतूनच जाताच दिवाळे निघाले आहे. पक्षांच्‍या देणगीदारांची संख्‍या कमी झाली असून, आता दिल्‍ली ते गल्‍ली अशा प्रत्‍येक कार्यकर्त्‍याकडून पक्ष वार्षिक 250 रुपये तर खासदार आणि आमदाराकडून एका महिन्‍याचा पगार देगणी म्‍हणून घेणार आहे.

देणगीच्या 25 टक्‍के रक्‍कम पक्षाच्‍या प्रादेशिक समित्‍यांवर खर्च केली जाणार आहे. उर्वरित 75 टक्‍के खर्च अखिल भारतीय कॉंग्रेस समितीसाठी राखीव असणार आहेत. या संदर्भात पक्षाचे राष्‍ट्रीय कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली.
देशातील सर्वात मोठा पक्ष म्‍हणून कॉंग्रेसचा उल्‍लेख केला जातो. स्‍वतंत्र भारताच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच कॉंग्रेसवर अशी वेळ आली.
पक्षांतर्गत निवडणुकाही पुढे ढकल्‍या
खर्च टाळण्‍यासाठी पक्षाने पक्षांतर्गत होणा-या विविध निवडणुकाही पुढे ढकल्‍यात. कुणी जर नव्‍याने कॉंग्रेस पक्षाचा सदस्‍य फॉर्म भरून देणार असेल तर त्‍यालासुद्धा सदस्‍य शुल्‍काव्‍यतिरिक्‍त 250 रुपये वार्षिक देणगी द्यावी लागणार आहे. तसेच एआयसीसीच्‍या प्रत्‍येक सदस्‍याला 600 रुपये तर पीसीसीच्‍या मेंबरला 300 रुपये द्यावे लागणार आहेत. हा नियम सर्वच राज्‍यात सारखा असेल, अशी माहितीही व्होरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
11 लाख कार्यकर्ते
सध्‍या देशभरात काँग्रेसचे तब्‍बल 11 लाख सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्‍यांच्‍या माध्‍यमातूनच 11 कोटी रुपये देणगी पक्षाला मिळणार आहे. यातून पक्षाचा वर्षभराचा खर्च भागवला जाऊ शकतो. पण, ज्‍या वर्षी निवडणुका आहेत त्‍या वर्षी यापेक्षी कितीतरी पट अधिक खर्च होतो.