आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Dating Distinguish Between Love And Friendship

जीवनसाथी भेटवण्याची नवी पद्धत; हालचालीतून आवडी ओळखण्याचे प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संकेतस्थळ जुस्कने डिजिटल डेटिंगमध्ये नव्या पद्धतीची सुरुवात केली आहे. मॅच. ई-हार्मनी आणि ओकेक्युपिड यांसारख्या मोठ्या साइट्स व्यक्तिमत्त्वाची प्रोफाइल व त्यांच्या आवडी-निवडीच्या संबंधी प्रश्नावलीच्या आधारे लोकांची भेट घडवून आणते. लोकांनी भेट घडवून आणण्यासाठी यूजरच्या हालचालींवर जास्त लक्ष देते. तुम्ही ज्या प्रकारचे चित्रपट पाहिले आहेत, त्या आधारे नेटफ्लिक्स तुम्हाला चित्रपट पाहण्याची शिफारस करते. काहीसे असेच जुस्क करत आहे. त्याचे म्हणणे आहे, ते साइटवर तुमच्या व्यवहाराच्या विश्लेषणातून जाणू शकते की, तुम्ही कोणत्या व्यक्तीत काय पसंत करतात. याही गोष्टीवर लक्ष ठेवले जाते की, कोणत्या लोकांच्या प्रोफाइल तुम्ही दीर्घ काळापर्यंत पाहत राहिले. ज्या लोकांना तुम्ही उत्तर देतात, दोघांत काय साम्ये आहेत.

समाजशास्त्रज्ञ आणि मार्केट संशोधन व्यावसायिक दीर्घकाळापासून जाणतात, लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असतो. इंटरनेटवर डेटिंगच्या जमान्याची सुरुवात झाल्यानंतर लोक मित्रांच्या माग काढण्यासाठी बरेच शोधकार्य करत असतात. डेटिंग संकेतस्थळ सर्वधिक उपयुक्त व्यक्तीशी नाते जोडण्यासाठी गाळणीसारेख काम करते. प्यू संशोधनानुसार सर्व वयोगटातील दहा टक्के अमेरिकन आणि 18 ते 35 वयोगटातील 20 टक्के लोकांनी ऑनलाइन डेटिंगचा वापर केला आहे.

प्यूच्या आणखी एका संशोधनातून पुढे आले आहे की, गेल्या दहा वर्षांत फक्त 11 टक्के लोकांनीच ऑनलाइन आधारावर जीवनसाथी शोधले आहेत. ऑनलाइन डेटिंग करणार्‍या लोकांमध्ये फक्त एक चतुर्थांश लोकांनीच एकमेकांशी टिकाऊ नाते बनवले आहे. त्यामुळे ऑनलाइन डेटिंग खेळात सुधारणेची गरज आहे. प्रश्न आहे की, एखाद्याच्या ऑनलाइन संवादाने संबंधित व्यक्तीचे वास्तविक रूप व त्याची आवड-निवड समोर येऊ शकते का?

स्टेनफोर्ड विद्यापीठाचे अर्थतज्ज्ञ पॉल ओयेर म्हणतात, व्यवहाराच्या आधारावर जोडी भेटवण्याची पद्धत चंगली आहे. तसे, जूस्कसोबत आपल्या अनुभवांच्या आधारावर मी सांगू शकते की, व्यवहाराच्या हिशोबाने तुम्हाला तुमची वास्तविक इच्छा आणि आवडीनिवडी समजण्यात मदत तर होते.