आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Exam For Railway Recruitment From Next Year

रेल्वे भरतीच्या परीक्षा पुढील वर्षापासून होणार ऑनलाइन, मंडळाकडून पथक स्थापन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - देशात नव्या सत्रापासून रेल्वेच्या भरती परीक्षा ऑनलाइन होतील. रेल्वे मंडळाने त्यासाठी समितीही स्थापन केली आहे. चेन्नईत ऑनलाइन परीक्षेत यश मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेचे प्रारूप तयार करण्यासाठी स्थापन समितीला हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

लेखी परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका फुटण्याची आणि कॉपीची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे गट ‘क’ आणि गट ‘ड’च्या परीक्षांत मोठ्या अडचणी येत होत्या. या परीक्षांत लाखोंच्या संख्येने परीक्षार्थी सहभागी होतात. त्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी मंडळाने स्थापलेली समिती पहिल्या टप्प्यात देशातील इतर संस्थांच्या या प्रक्रियेचा अभ्यास करेल. तज्ज्ञांच्या मते, सध्या अनेक संस्था ऑनलाइन परीक्षा उत्कृष्टरीत्या आयोजित करतात. या प्रक्रियेचा अभ्यास केल्यास समितीला प्रारूप तयार करण्यात फायदा होईल आणि लवकरच ती प्रत्यक्षात आणता येईल. रेल्वे मंडळाचे जनसंपर्क अधिकारी अनिल सक्सेना यांनी सांगितले की, ऑनलाइन परीक्षेसाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई सुरू होईल.