आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाइन हेल्पलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही खुशखबर आहे. कारण दैनंदिन जीवनात येणार्‍या अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांना आता ऑनलाइन मदतीचा हात उपलब्ध होणार आहे.

राजधानीतील एजवेल नावाच्या संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. वयोवृद्धांना दैनंदिन जीवनात अतिशय छोट्या समस्यांना सामोरे जावे लागते. वयोमानानुसार त्यांना अशा समस्या सोडवता येत नाहीत. त्यासाठी इतरांची मदत अपेक्षित असते. त्यामुळेच एजवेलने पुढाकार घेतला आहे. पूर्वी समस्यांचे प्रमाण आणि त्याबद्दल मोकळेपणाने बोलणारा 60 ते 67 वयोगटातील वर्ग होता. फोनवरून आमच्यापर्यंत समस्या पोहोचवल्या जात होत्या. आता मात्र हा वयोगट 70 ते 80 असा झाला आहे. ते आपल्या समस्या आमच्याकडे बिनधास्तपणे मांडू लागले आहेत. त्यांना याची सोडवणूक करण्याची इच्छा असते, अशी माहिती एजवेल फाउंडेशनचे अध्यक्ष हिमांशू रथ यांनी दिली. सामाजिक, वैद्यकीय, कायदा आणि अर्थ क्षेत्रातील व्यक्तींचा स्वयंसेवकांमध्ये समावेश आहे.

सेवा स्वरूप कसे ?
एजवेल फाउंडेशनने देशातील शेकडो जिल्ह्यांत हेल्पलाइनची सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सेवा मोफत स्वरूपाची आहे.

640 जिल्ह्यांत स्वयंसेवक
80,000 स्वयंसेवकांची एकूण संख्या

प्रशिक्षित स्वयंसेवक
एजवेल संस्थेकडे अत्यंत प्रशिक्षित स्वयंसेवक आहेत. ज्येष्ठ नागरिकांकडून आलेल्या फोनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. संस्थेकडून ज्येष्ठांच्या समस्यांचे रेकॉडिंग केले जाते.

प्रदीर्घ अनुभव
एजवेल फाउंडेशनने ऑनलाइन मदतीचा हात पुढे करताना आधुनिक काळातील संवाद साधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु एजवेलने 15 वर्षांपूर्वी फोनवरून मदत देण्याचा उपक्रम सुरू केला होता.