आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा कर रद्दमुळे पर्यटनाला चालना, तिकीट बुकिंगवरील कर रद्दच्या निर्णयाचे तज्ज्ञांकडून स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगवर सेवा कर लागणार नसल्याचे अर्थसंकल्पात घोषित झाल्यानंतर देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. या निर्णयामुळे पूर्वीच्या तुलनेत पर्यटन आणखी स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. 

या निर्णयाचा फायदा सेवा पुरवठादार आणि पर्यटक दोघांनाही होणार आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल “स्कायस्कॅनर’च्या मते, मागील एक वर्षापासून स्मार्टफोनच्या माध्यमातून तिकीट बुक करणाऱ्यांची संख्या बरीच वाढली होती. परंतु सेवाकर रद्द केल्याने यात आणखीनच वाढ होणार आहे. “स्कायस्कॅनर’च्या विकास व्यवस्थापक रश्मी रॉय म्हणाल्या की, सरकारच्या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी ट्रॅव्हल कंपन्यांना चांगली संधी चालून आली आहे. या निर्णयामुळे पर्यटकांची यात्रा सोपी आणि स्वस्त होण्यास मदत मिळणार आहे.

यात्रा डॉट कॉमचे शरत ठाल म्हणाले की, डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारने आखलेले नवीन धोरण अतिशय चांगले आहे. यामुळे देश कॅशलेसकडे वळणार आहे. ऑनलाइन तिकीट बुकिंगवरील सेवा कर रद्द करण्याचा निर्णयही कॅशलेसच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तर सध्याच्या काळात तंत्रज्ञान हे पर्यटन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे ‘इंडियन रूट’चे अरविंद भाटिया यांनी सांगितले. सेवा कर रद्द केल्याने केवळ पर्यटकच नव्हे, तर या क्षेत्रातील सेवा पुरवठादारांनाही याचा फायदा होणार असल्याचे या वेळी सांगितले आहे. 
बातम्या आणखी आहेत...