आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 20% शेतकरी उतरवतात पीक विमा, असोचेम-स्कायमेटच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात २० टक्क्यांहून कमी शेतकरी पीक विमा उतरवतात. त्यामुळेच अवकाळी, गारपीट झाल्यास त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. उद्योग संघटना आणि स्कायमेट वेदर यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणातील हे निष्कर्ष आहेत. या सर्व्हेनुसार, देशातील १९ टक्क्यांपेक्षा कमी शेतकरी पीक विम्याचे संरक्षण घेतात. सुमारे ८१ टक्के शेतकरी या सुविधेबाबत जागरूक नाहीत.

सर्व्हेनुसार, देशातील ३२ कोटी शेतकरी विविध पिकांचा विमा उतरवतात. मात्र, या संदर्भातील दाव्यांचा निपटारा होण्यात लागणा-या विलंबाबाबत शेतकरी या विम्याबाबत निराश आहेत. असोचेमच्या मते, योजना लागू करणे आणि तांत्रिक समस्यांमुळे दाव्यांच्या निपटा-या त फारशी सुधारणा होत नाही. सरकारने या संदर्भात सविस्तर धोरण आखून काम केले पाहिजे. असोचेमने सांगितले, राष्ट्रीय पीक योजनेबाबत (एनसीआयएस) सरकार खासगी भागीदारीतून यात सुधारणा करण्याचे प्रयत्न करत आहे. असे झाले तर, ही योजना सरकारच्या पूर्वीच्या अनुदान वाटप आणि दावा निपटा-या त उजवी ठरेल. खासगी क्षेत्र या क्षेत्रात आल्यास जीपीआरएस आणि कॅमेरा असणा-या मोबाइल फोनच्या मदतीमुळे पीक विमा योजना प्रभावी ठरू शकते. यामुळे शेतक-या ंच्या दावा निपटा-या ला गती येईल.

पीक विमा योजना प्रभावी बनवण्यासाठी एनसीआयएसशिवाय सरकारने आणखी काही योजना सुरू केल्या असल्याचे असोचेमने म्हटले आहे. राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रम (एनसीआयपी), सुधारित कृषी विमा योजना (एमएनएआयएस) आणि हवामान आधारित विमा योजना (डब्ल्यूबीआयएस) या त्या योजना आहेत. शेतक-यांना या योजनांची माहिती करून देणे तसेच याच्या फायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे यासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे.
शेतक-यांच्या अडचणी
४६ टक्के शेतक-यांना पीक विम्याबाबत माहिती आहे, परंतु रस नाही
२४ टक्के शेतक-यांनी सांगितले, पीक विम्याची माहिती नाही.
११ टक्के शेतकरी विमा हप्ता भरण्यास सक्षम नाहीत.