आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडीबहाद्दर सचिन आणि रेखा; 59 लाखांचे वेतन-भत्ते, पण.., थोडेच दिवस दिसले संसदेत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेतील उपस्थितीबाबत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर अाणि अभिनेत्री रेखाचे रेकॉर्ड भलतेच किरकोळ ठरले आहे. सचिन अाणि रेखा यांना २०१२ मध्ये राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून घेण्यात आले होते. 

राज्यसभेच्या आकडेवारीनुसार २०१२ पासून आजपर्यंतच्या ३४८ कामकाजाच्या दिवसांत सचिन २३, तर रेखा या फक्त १८ वेळाच संसदेत हजर राहिल्या. सचिनवर २०१२ पासून आतापर्यत ५८.८ लाख रुपये खर्च झाले आहेत. राज्यसभेचा खासदार असल्यामुळे त्याला प्रति महिना ५० हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय संसदीय मतदारसंघासाठी खर्च म्हणून दरमहा ४५ हजार रुपये, कार्यालय खर्चापोटी १५ हजार आणि प्रवास व दैनिक भत्त्यांपोटीही पैसे मिळतात.
बातम्या आणखी आहेत...