आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीतील निर्भयाबरोबर झालेल्या दूर्दैवी घटनेनंतर घोषणांची घाई, कारवाई नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील दुर्दैवी घटनेनंतर सरकारने केलेल्या बहुतांश घोषणा थंड बस्त्यात गेल्या आहेत. ज्या वेगाने सरकारने या सर्व घोषणा केल्या होत्या तो वेग अंमलबजावणीमध्ये दिसून आलेला नाही. निर्भया फंड असो, फास्ट ट्रॅक कोर्ट असो की, महिलांच्या हातात सुरक्षा घड्याळ देणे... सर्वच घोषणा घोषणाच बनून राहिल्या आहेत.


महिलांसाठी 181 ही हेल्पलाइन सुरू करण्याचा मानसही पूर्ण होताना दिसत नाही. दिल्लीव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यांत या योजनांबाबत काही हालचाली असल्याची माहिती अद्याप सरकारला मिळालेली नाही. आता केंद्राने सर्व राज्यांना पत्राद्वारे 181 हेल्पलाइन लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.


महिलांच्या सुरक्षेसाठी एक खास घड्याळ तयार केले जाणार होते. एखादी महिला संकटात असल्यास रक्तदाबाच्या आधारे हे घड्याळ संबंधित महिलेच्या नातेवाइकांसह पोलिसांना माहिती पुरवेल, असे सांगण्यात आले होते. मोबाइल नेटवर्क नसणा-या ठिकाणीही हे घड्याळ चालणार, असेही सांगण्यात आले होते. मात्र, त्यासंदर्भात अद्याप काहीही ठोस निर्णय झालेला नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्यासंदर्भातही सरकारी पातळीवर अद्याप काही निर्णय झालेला नाही.
या सर्वांव्यतिरिक्त केंद्र सरकारने महिला व बाल विकास मंत्रालयाला सुमारे 200 कोटींचा विशेष निधी दिला होता. मात्र, त्यातून अद्याप एकही योजना समोर आलेली दिसत नाही. महिलांसाठी 9 कोटींचे वन स्ट्राइप क्रायसिस सेंटर बनवण्याचा आणि सुमारे 75 कोटींपेक्षा अधिक पीडितांच्या नातेवाइकांसाठीच्या सांत्वना योजनेचा नवीन आराखडा बनवण्याचा प्रस्तावही प्रलंबित आहे.