आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीओके पाककडून हिसकावणे हाच एकमेव मुद्दा : जितेंद्र सिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-पाकिस्तानमध्ये उत्तर- प्रत्युत्तरांचे सत्र सुरूच आहे. सुरुवात पाकिस्तानने केली. पाक लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी शत्रूने पुन्हा दु:साहस केले तर त्‍यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी दिली आहे. काश्मीरला विभाजनाचा अर्धवट अजेंडा ठरवत राहील यांनी म्हटले की, जो देश आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करेल त्यांना उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. पाक लष्करप्रमुखांच्या धमकीला पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, काश्मीर भारताचा भाग आहे यावर कोणताही संशय नाही. आमच्यावर कोणी संशय घेऊ नये. पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरवर तिरंगा कसा फडकवला जावा याचा आम्ही विचार करत आहोत. भाजपचे चिटणीस सिद्धार्थनाथ सिंह यांनीही चोख उत्तर दिले. पाकिस्तानी लष्कराला १९६५,१९७१ आणि कारगिल युद्धात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. पाक लष्करप्रमुख भारताशी लढू इच्छित असतील तर ते दिवसा स्वप्न पाहत आहेत.