आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only Live Separate Its Not Sufficient For The Divorce , Judgment Of Supreme Court

\'पती-पत्नी वेगळे राहत असले तरी घटस्फोटासाठी ते पुरेसे नाही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पती-पत्नी वेगळे राहत असले तरी घटस्फोटासाठी हा आधार पुरेसा ठरत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पत्नी बारा वर्षांपासून दूर राहत असल्याचा दावा करणा-या एका पतीची याचिका फेटाळताना न्यायालयाने हे स्पष्ट केले.

न्यायमूर्ती पी. सदाशिवम व जे.एस. खैहर यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे. पत्नीच्या जागी तो असता तर ? असा सवाल करून न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली. पत्नी पुन्हा पतीसोबत राहू इच्छिते. तसे तिने वारंवार म्हटले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत घटस्फोट स्वीकारला जाऊ शकत नाही. त्याचबरोबर पत्नीच्या या अवस्थेला पतीच जबाबदार असल्याबद्दल न्यायालयाने पतीची कानउघाडणी केली.

काय आहे प्रकरण ?
सदर प्रकरणात 1997 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. त्या वेळी दोघेही किशोरवयीन होते. दुस-या प्रसूतीनंतर पत्नीची मानसिक स्थिती बिघडली. पतीने पत्नीच्या मानसिक स्थितीच्या आधारे कुटुंब न्यायालयात घटस्फोट मागितला होता. मात्र, न्यायालयाने पत्नीची मानसिक स्थिती सामान्य असल्याचे सांगितले. ती आपल्या वैवाहिक जबाबदा-या पार पाडू शकते. त्यामुळे पतीचा अर्ज फेटाळण्यात आला होता. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानेदेखील घटस्फोट देण्यास नकार दिला होता.