आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: दक्षिण दिल्लीत खुलेआम लागतो सेक्सचा बाजार, वाचा वास्तव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या राजधानातील दक्षिण भाग श्रीमंतांचा परिसर म्हणून ओळखला जातो. येथे पैसा हेच सत्य आहे. पैशाच्या बळावर तुम्ही काहीही विकत घेऊ शकता. या परिसरात सेक्स रॅकेट वाढले आहेत. अगदी राजरोसपणे रस्त्यांवर सेक्स रॅकेट चालविले जातात. रात्र झाली, रस्त्यावर काळोख पसरला की सेक्सची बाजारपेठेत अगदी फुललेली दिसून येते.

मुलचंद उड्डाणपूल आणि बारापुल्लाह इलिव्हेटर कॉरिडोर परिसरात रात्रीच्या सुमारास आणि कधी दिवसाही रस्त्यांच्या दुतर्फा तरुणी उभ्या असल्याचे दिसून येते. यावेळी त्यांनी फारच तोकडे कपडे घातले असतात. या तरुणी बहुधा शॉर्ट स्कर्ट घालतात. त्या कुणाची तरी वाट बघत असतात. सुरवातीला वाटेल, की त्या बॉयफ्रेंड किंवा मित्राची वाट बघत आहेत. पण जरा जवळ जाऊन चौकशी केली तर त्या चक्क पैशांची बोलणी करतात.यातील काही तरुणी तुम्ही म्हणाल तिथे येण्यास तयार असतात तर काही केवळ कारमध्येच सेवा देण्याचा आग्रह धरतात.

येथील भाषेत एका वेळच्या सेवेला 'वन शॉट' असे म्हटले जाते. यासाठी मुलीच्या दिसण्यावरुन 500 ते 1500 रुपये घेतले जातात. या रस्त्यावर केवळ तरुणीच नव्हे तर ट्रान्सजेंडरही या व्यवसायात गुंतले आहेत. यावेळी आमच्या प्रतिनिधीने एका तरुणीचा विचारणा केली तर ती म्हणाली, की एका शॉटचे 1500 रुपये. पण मी घरी येणार नाही. कारमध्येच सेवा देईन.
त्यानंतर एका ट्रान्सजेंडरने सांगितले, की या रस्त्यावर तुम्ही पोलिसांची भीती बाळगायला नको. माझ्यावर सोडून द्या. तुम्ही येथे पहिल्यांदाच आलेले आहात का... आम्ही अनेक वर्षांपासून आम्ही व्यवसाय करतोय. जराही घाबरु नका.त्यानंतर तो म्हणाला, की जर तुम्हाला कारमध्ये शक्य नसेल तर आम्ही घरीही सेवा देतो.विशेष म्हणजे हे सगळे पोलिसांच्या नाकाखाली चालते. या परिसरात पोलिसांचे गस्ती पथकही फिरत असते. पण तरीही ते कुणाला अटक करीत नाहीत. केवळ सोईस्कर डोळेझाक करतात. कदाचित याचे मुल्य त्यांना मिळत असावे.

पुढील स्लाईडवर बघा, दक्षिण दिल्लीत कसा चालतो सेक्सचा व्यापार... फोटो आणि व्हिडिओ...