आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसविरुद्ध ‘ऑपरेशन चक्रव्यूह’, दहशतवादी धोक्यावर गृह मंत्रालयाच्या बैठकीत निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अतिरेकी संघटना इसिस भारतात बस्तान बसवत आहे. १२ राज्यांत इसिससंबंधी कारवायांना वेग आला आहे. रोज १३३ तरुण इसिसच्या कट्टरपंथी विचारधारेने प्रभावित होत आहेत. यामुळे सिमी व इंडियन मुजाहिदीन सारख्या संघटनांना बळ मिळत आहे. या गुप्तवार्तांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव एलसी गोयल यांनी शनिवारी महाराष्ट्रासह १२ राज्यांच्या गृह सचिव आणि पोलिस प्रमुखांशी चर्चा केली. त्यात अतिरेकी संघटनांविरुद्ध ‘ऑपरेशन चक्रव्यूह’ राबवण्यावर केंद्र आणि राज्यांत एकमत झाले.

धर्मगुरूंना पोलिस यंत्रणेशी जोडणार
1.सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी सायबर पोलिस सक्रिय होतील. एखादा तरुण कट्टरपंथी विचारधारेशी जुळला तर त्याच्या कुटुंबीयांना सांगितले जाईल. तरीही तो बधला नाही तर अटक होईल.
2.सामुदायिक व्यवस्था मजबूत केली जाईल. मदरसे-मशिदींच्या बड्या मौलाना व सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिस यंत्रणेशी जोडले जाईल. तरुणांना आयएसच्या कारवाया सांगितल्या जातील.
3.आयएसला मदत करणा-या सिमी व आयएमच्या फरारांना पकडले जाईल. जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी व इतर कट्टरपंथांवर नजर ठेवली जाईल. अचानक कुणी श्रीमंत झाला तर पोलिसांना सूचना दिली जाईल.