आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन क्लीन मनी : 9,334 कोटींचा काळा पैसा, 60,000 लोकांना नोटीसा बजावणार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
28 फेब्रुवारी 2017 पर्यंत 9,334 कोटी अघोषित संपत्तीचा पत्ता लागला आहे. - Divya Marathi
28 फेब्रुवारी 2017 पर्यंत 9,334 कोटी अघोषित संपत्तीचा पत्ता लागला आहे.
नवी दिल्ली - आयकर विभागाने नोटाबंदीनंतर काळा पैसा शोधून काढण्यासाठी सुरू केलेल्या 'ऑपरेशन क्लीन मनी' च्या दुसऱ्या टप्प्यातील कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत आयकर विभाग 60 हजारांहून अधिक लोकांना नोटीसा बजावणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी) ने दिलेल्या माहितीप्रमाणे, नोटाबंदीनंतर 9 नोव्हेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत 9,334 कोटी अघोषित संपत्तीचा पत्ता लागला आहे. 
 
60 हजार लोकांची यादी तयार...
- सीबीडीटीने अघोषित संपत्ती बाळगणाऱ्या 60 हजार जणांचा तपशील काढला आहे. यापैकी 1300 जणांनी नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले होते. अशा लोकांच्या व्यवहारांचा सखोल तपास केला जाणार आहे. 
- ऑपरेशन क्लीन मनीच्या दुसऱ्या टप्प्यात 6000 हून अधिक महागड्या मालमत्ता व्यवहार आणि 6600 परदेशात संपत्ती पाठवल्याचे प्रकार समोर आले आहेत. या सर्वच प्रकरणांमध्ये उत्तर मागवण्यात आले होते. ज्या लोकांनी उत्तरे दिली नाहीत, त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. 
- एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे संशयास्पद कॅश डिपॉझिट करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी आणि त्यांचा तपशील काढण्यासाठी अॅडव्हांस डेटा अॅनेलॅटिक्सचा वापर केला जात आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...