आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन संकटमोचन: सुदानमधील 500 भारतीयांना करणार एअरलिफ्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/जुबा- दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहकलाहाचा फटका तेथील भारतीयांना बसला आहे. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन संकटमोचन' सुरु केले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या 500 भारतीयांना एअरलिफ्ट करण्‍यात येणार आहे. मोदी सरकारने गुरुवारी दोन C-17 विमान जुबामध्ये पाठवले आहे. 'ऑपरेशन संकटमोचन'ची संपूर्ण जबाबदारी परराष्‍ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती केंद्रीय परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

दरम्यान, दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सुदान रवाना होण्यापूर्वी 'ट्वीट' करून सांग‍ितले आहे.

दरमम्यान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या गटातील अंतर्गत संघर्षामुळे सुदानमध्ये गृहकलह सुरु आहे. यात झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक...
- परराष्ट्र मंत्रालयाने दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहे.
+211955589611,
+211925502025,
+211956942720,
+211955318587

याशिवाय controlroomjuba@gmail.com हा ई-मेल आयडी दिला आहे. सुदानमधील नागरिकांची माहिती जाणून घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहनही परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
दक्षिण सुदानमध्ये अडकले 500 हून अधिक भारतीय...
- दक्षिण सुदानची राजधानी जुबामध्ये 500 हून अधिक भारतीय अडकले आहे. जुबामध्ये ते बिझनेस करण्‍यासाठी गेले होते. तर काही लोक तेथे कंपन्यांमध्ये नोकरी करतात.

पुढील स्लाइडवर वाचा, अक्षय कुमारच्या 'ट्वीट'ला सुषमांनी दिलेले प्रत्युत्तर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...