आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion Poll Hints Bjp Forming Government In 4 Major States And Arvind Kejriwal May Prove King Maker In Delhi

दिल्‍लीत केजरीवाल ठरणार किंगमेकर, भाजपला 4 राज्‍यांमध्‍ये आघाडीचे संकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चार मोठ्या राज्‍यांमध्‍ये आघाडी मिळणार असल्‍याचा अंदाज एका सर्वेक्षणात करण्‍यात आला आहे. मध्‍य प्रदेश आणि छत्तीसगढमध्‍ये भाजप सत्ता कायम राखण्‍यात यशस्‍वी ठरेल. तर राजस्‍थानमध्‍ये भाजप पुन्‍हा सत्तेवर येईल आणि दिल्‍लीत सर्वाधिक जागा पक्षाला मिळतील, असा अंदाज आहे. सर्वेक्षणानुसार, दिल्‍लीत कोणत्‍याच पक्षाला स्‍पष्‍ट बहुमत मिळणार नाही. मात्र, अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी सत्तेची समीकरणे बदलू शकते. सत्ता स्‍थापनेत केजरीवाल महत्त्चाची भूमिका बजावू शकतात, असा अदांज आहे. टाईम्‍स नाऊ आणि हेडलाईन्‍स टुडे या दोन वृत्तवाहिन्‍यांनी हे सर्वेक्षण केले आहे. पंतप्रधानपदावरुनही या सर्वेक्षणात चाचपणी करण्‍यात आली. दिल्‍लीत 55 आणि राजस्‍थानात 48 टक्‍के नागरिकांनी नरेंद्र मोदींना पसंती दिली. तर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिल्‍लीत 18 आणि राजस्‍थानमध्‍ये 17 टक्‍के नागरिकांनी पाठींबा दिला.

काय आहेत सर्वेक्षणातील अंदाज? वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये....