आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opnion Poll Stopped, Election Commission Urge To Union Government

जनमत चाचण्यांवर बंदी घालण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून जनमत चाचण्यांवर बंदी आणण्याची मागणी निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. यासाठी आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. या मुद्द्यावर आयोगाला अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिलेला आहे.
निवडणूक आयोगानुसार 15 पक्षांनी जनमत चाचण्यांवर बंदी आणण्याबाबत त्यांचे मत दिलेले आहे. यात पाच राष्‍ट्रीय, तर 10 प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. बहुतांश पक्षांनी बंदीला पाठिंबा दर्शवला आहे.
आयोगाने पत्रात म्हटले आहे की, याबाबतीत 6 एप्रिल 2004 राजकीय पक्षांसोबत सल्लामसलत करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांच्याकडून मत मागवण्यात आले. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेनंतर जनमत चाचण्यांचे प्रसारण व प्रकाशन बंद करण्यात यावे, असा आयोगाचा मूळ प्रस्ताव आहे. काँग्रेस, माकप, बसपा, राष्‍ट्रवादी काँग्रेस, सपा, द्रमुक, अण्णाद्रमुक, जदयू, शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाने त्याला सहमती दर्शवली आहे. मात्र भाजपने त्याला विरोध केला आहे.