आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Opponent Agreed To The Debate In Loksabha, But The Ruling Dispensation Condition

लोकसभेत विरोधक नोटबंदीच्या मुद्द्यावर चर्चेला राजी, पण सत्ताधाऱ्यांची माफीची अट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीवर संसदेत गोंधळ सुरू आहे. शुक्रवारीही कामकाज झाले नाही. संसदेची पुढील बैठक बुधवारीच होणार आहे. हिवाळी सत्रात गोंधळाचीच भेट मिळणार की काय? संसदेचे सत्र १६ डिसेंबर रोजी संपत आहे.

विरोधी पक्षांनी शुक्रवारी सकाळी सांगितले की, राहुल गांधी लोकसभेत नोटबंदीवर बोलतील. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनाला सांगितले की, नोटबंदीवर चर्चा सुरू करण्याच्या बाजूने आहेत. त्यांनी नियम- १८४ वा ५६ चा उल्लेख नाही केला. यावर सरकारने पलटवार केला. सांसदीय कार्यमंत्री अनंतकुमारांनी सांगितले की, १७ दिवसांपर्यंत संसद ठप्प करण्यासाठी कॉंग्रेस, तृणमूल व डाव्या पक्षांनी देशाची माफी मागावी. इथेच गोष्ट बिघडली आणि पुन्हा गोंधळ सुरू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपची इच्छा होती की, कांॅग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी राज्यसभेत चर्चा सुरू करावी. तिथे अर्थमंत्री अरुण जेटलींचे भाषण झाल्यानंतर राहुल यांना लोकसभेत बोलू दिले जाईल. पण विरोधी पक्षांनी गहु आयातीवरील शुल्क हटविण्याचा मुद्दा उठवताना राज्यसभेत नोटबंदीवर चर्चा सुरू होऊच दिली नाही. यानंतर सत्ताधारी पक्षाने लोकसभेत विरोधी पक्षांची चर्चेची गोष्ट डोक्यावर चढू दिली नाही. भाजपला शंका होती की, कॉंग्रेस लोकसभेत नोटबंदीवर राहुल यांचे भाषण झाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना बोलू देणार नाही. कांॅग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी लोकसभा सभापतींंना भेटून सदनातील भाजपच्या गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

नोटबंदीने मोदींनी देशातील सव्वा अब्ज जनतेचा विश्वास तोडला, यामुळे विकास मंदावेल : मनमोहन
माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांनी मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला खूपच त्रासदायक ठरविले. त्यांनी सांगितले की, याचे गंभीर दुष्परिणाम होतील. मनमोहन यांनी एका लेखात सांगितले की, मोदीच्या एका अविवेकपूर्ण निर्णयाने सव्वा अब्ज जनतेची अपेक्षा आणि विश्वास घालविला आहे. नोटबंदीमुळे येणाऱ्या काळात आर्थिक विकास मंदावेल. हा निर्णय प्रामाणिक देशवासीयांना खोल जखम पोहोचेल, तथापि बेइमान आणि काळेधनवाल्यांसाठी हे बोटावरील जखम खरचटलेले सिद्ध होईल.

प्लास्टिक चलन आणणार सरकार, ५ वर्षे असते त्याचे सरासरी वय, नकली नोटा छापणे होणार कठीण
केंद्र सरकार लवकरच हे प्लास्टिक चलन आणणार. अर्थराज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी संसदेत सांगितले. प्लास्टिक वा पॉलिमर सब्स्ट्रेटने प्लास्टिकच्या नोटांची छपाईचा निर्णय घेतला. याची प्रक्रिया सुरू झालीय. रिझर्व्ह बंॅक दीर्घकाळापासून प्लास्टिक चलन आणण्याची योजना बनवत आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये यूपीए सरकारने संसदेला सांगितले की, १० रुपयांच्या नोटांच्या रूपात १ अब्जांच्या प्लास्टिक नोटा छापतील. या नोटांचे सरासरी जीवन ५ वर्षांचे असते. त्याची नकली मुद्रा-नोट तयार करणे कठीणच आहे.
बातम्या आणखी आहेत...