आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक क्रिकेट मालिका यंदा नाहीच, संसदेतही झाली चर्चा, भाजपचा विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डिसेंबर 2015 मध्ये संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये नियोजित असलेली भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका यंदा होणार नाही. केंद्र सरकारशी संबंधित सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. रविवारी बीसीसीआय आणि पीसीबीच्या अध्यक्षांनी यंदा भारत-पाक मालिका घेण्याचा प्रस्ताव दिला होता. पण सोमवारी या मालिकेच्या मुद्यावरून संसदेत भाजप खासदारांनी विरोध केला.

भाजप खासदारांनी विरोध केला
भारतीय जनता पार्टी (बीजेपी) चे खासदार आणि माजी गृह सचिव आर.के. सिंह यांनी लोकसभेत शून्यकाळात भारत पाकिस्तान यांच्यातील नियोजित क्रिकेट मालिकेचा मुद्दा उपस्थित केला होता.

बिहारच्या आरा येथील खासदार असलेल्या सिंह यांनी 26/11 च्या मुंभी हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका, हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर-रेहमान लखवी याची सुटका आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आसरा देण्याचे मुद्दे उपस्थित केले. दहशतवाद्यांना त्यांच्या भूमीचा वापर करू देणारा आणि आपल्यावर हल्ले करणाऱ्या देशाबरोबर क्रिकेट खेळण्याचे औचित्य काय हेच कळत नसल्याचे ते म्हणाले.

सरकारने करावा विचार
आरके सिंह यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दाऊद संदर्भातील वक्तव्याचा उल्लेख करत म्हटले की, "गृहमंत्री म्हणाले आहेत की, मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानच आहे. सीमारेषेवर ही वरचेवर तणाव निर्माण होतो. अशा स्थितीत सरकारने गांभीर्याने विचार करावा एवढेच आपले म्हणणे असल्याचे ते म्हणाले.

3 टेस्ट , 5 वन डे आणइ 2 T 20 चा प्रस्ताव
रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळांचे प्रमुख जगमोहन दालमिया आणि शहरयार खान यांची कोलकात्यात भेट झाली. त्यानंतर हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यात भारत पाकिस्तान दरम्यान मालिकेत तीन टेस्ट, पाच वनडे आणि दोन टी-20 सामन्ये नियोजित होते.